निवृत्ती वेतनधारकांनी मुळ बँक खाते सुरु ठेवावे ई – कुबेर प्रणालीद्वारे थेट जमा होणार पेन्शन

निवृत्ती वेतनधारकांनी मुळ बँक खाते सुरु ठेवावे

ई – कुबेर प्रणालीद्वारे थेट जमा होणार पेन्शन

चंद्रपूर, दि.9 : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांचे मासिक निवृत्ती वेतन हे मार्च 2024 पासून ई – कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात जमा होणार असल्याने निवृत्तीवेतन धारकांनी आपले मुळ बँक खाते सुरू ठेवण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी केले आहे.

            पेन्शन जमा होण्यासाठी जी बँक निवृत्ती वेतनधारकांनी घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी कोडनुसार ही पेन्शन जमा होणार आहे. जर काही पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात अथवा इतर बँकेत बदल करून घेतले असेल, अशा पेशनधारकांची पेन्शन जमा करण्यास अडचण निर्माण होतील. तरी ज्या पेन्शनधारकांनी बँक खाते इतर जिल्ह्यात अथवा इतर बँकेत बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मुळ बँक खाते ज्या बँकेत सुरु असेल तेच कायम ठेवावे. जेणेकरून निवृत्तीवेतन बँकेत जमा करण्यास अडचण जाणार नाही. तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.