जिल्हा क्रीडा संकुल येथे उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जिल्हा क्रीडा संकुल येथे उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि.6 : जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावाचे विशेष बाब निधी अंतर्गत अद्यावतीकरण करण्यात आलेले असून मे महिन्यापासून येथे उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

लहान मुलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे तसेच ते मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे, याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात येत असून प्रशिक्षण शिबिराकरिता 20 एप्रिलपासून प्रवेश देणे सुरु करण्यात येणार आहे.

उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात सर्व जलतरण प्रशिक्षकांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी मे महिन्यापासून शिबीर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस विनोद ठिकरे, विजय डोबाळे, संदीप उईके, महेंद्र कपूर, धनंजय वड्यालकर, मोरेश्वर भरडकर, श्रीकांत बल्की, कैलास किरडे, निलकंठ चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावाच्या अद्यावतीकरणाचे काम सुरू असल्याने काही काळ सदर तलाव बंद होता. मात्र आता येथे राष्ट्रीय दर्जाचा मोठा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. येथे लहान व मोठा असे 2 जलतरण तलाव असून तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण शिबिरासाठी नाव नोंदणीकरिता नीलकंठ चौधरी (9326211299) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.