रब्बी हंगामासाठी मका पिकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी.

रब्बी हंगामासाठी मका पिकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी.

               भंडारा, दिनांक 6 : आधारभूत किंमत मका खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2023-24 करिता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, पणन महासंघाच्या अ वर्ग सभासद असलेल्या संस्थेच्या मका खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी व त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की जमिनीचा ऑनलाईन सातबारा उतारा, नमुना 8, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये मका खरेदी करता येईल. तरी दि. 30/04/2024 पर्यंत शेतकरी बाधवांनी उन्हाळी मका खरेदीसाठी पुर्वतयारी म्हणुन खालील नमुद संस्था कागदपत्र सादर करुन मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचा लाभ घेण्यात यावा असे जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडुन आवाहन करण्यात येत आहे.

अ.क्रं.

तालुका

संस्थेचे नाव

केंद्राचे नाव

1

लाखनी

साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लि.लाखनी

साकोली

2

लाखनी

साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लि.लाखनी

लाखनी

3

लाखांदुर

कृषी उत्पन्न्‍ बाजार समिती लाखांदुर

लाखांदुर