पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने भेजगावच्या विद्युत उपकेंद्र प्रकल्पाच्या जागेचा मार्ग मोकळा जिल्हाधिकारी यांचे आदेश निर्गमित

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने भेजगावच्या विद्युत उपकेंद्र प्रकल्पाच्या जागेचा मार्ग मोकळा जिल्हाधिकारी यांचे आदेश निर्गमित

 

चंद्रपूर, दि. 18 : वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार जिल्ह्याधिकारी यांनी बल्लारपूर विधानसभेतील मुल तालुक्यातील मौजा भेजगाव ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या निर्मितीसाठी जागेचा आगाऊ ताबा देण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे.

 

३३ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्मितीचा मार्ग अनेक दिवसांपासून प्रलंबित होता : यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून विद्युत पारेषण विभागाची मागणी होती, स्थानिक नागरिकांच्या सुविधेसाठी हे उपकेंद्र आवश्यक असल्याने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गांभीर्याने दखल घेत चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन सदर जागेचा प्रश्न निकाली काढावा, अशी विनंती केली होती . चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी ३३ केव्ही उपकेंद्र प्रकल्पासाठी जागेचा आगाऊ ताबा देण्याचे आदेश काढलेले आहे.

 

होणाऱ्या विद्युत उपकेंद्रामुळे भेजगाव, सिंतळा, येरगाव, चेक घोसरी, येसगाव, भंजाळी, दुगाळा माल, चक दुगाळा दहेगाव, मानकापूर, पिपरी दीक्षित, चेक बेंबाळ, हळदी चिंचाळा, नलेश्वर, बेंबाळ व इतर गावांना सुद्धा ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचा फायदा होणार आहे. ज्यामुळे उच्च दाबाचा विद्युत प्रवाह अखंडपणे सुरु राहील,घरगुती वापराच्या व शेतीच्या सिंचनाच्या दृष्टीने कृषी पंपांना वीज पुरवठ्याच्या अडचणी दूर होणार आहेत.त्यामुळे गावांच्या सर्वांगीण विकासाला भर पडेल.