आदर्श आचारसंहिता संदर्भातील प्रस्तावांची छाननी करण्यासाठी समिती गठीत

आदर्श आचारसंहिता संदर्भातील प्रस्तावांची छाननी करण्यासाठी समिती गठीत

१२ – गडचिरोली-चिमुर लोकसभा निवडणूक – २०२४ करीता आदर्श आचारसंहिता संदर्भातील प्रस्तावांची छाननी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी एका आदेशान्वये छाननी समिती गठीत केली आहे.

या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी हे असून सदस्य म्हणून उप जिल्हा निवडणूक अधिकारी, आदर्श आचार संहिता नोडल अधिकारी व प्रस्तावाशी संबंधित विभागाचे विभाग प्रमुख हे राहतील.
ही छाननी समिती भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन प्राप्त प्रस्तावांची छाननी करेल व पात्र प्रस्ताव संपूर्ण तपशीलासह मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करेल. त्यांचेमार्फत सदर प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर होतील.
आदर्श आचारसंहिता कालावधीत प्रस्ताव सादर करताना संबंधीत विभागांनी सदर प्रस्तावावर प्रथम आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करावा, अंतिम क्षणी प्रस्ताव पाठविणे टाळावे व कोणताही प्रस्ताव थेट राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर न करता केवळ समितीमार्फत सादर करावा अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.