अनुकंपाधारकांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर

अनुकंपाधारकांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर

चंद्रपूर, ता. १३ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील मंजूर आकृतीबंधानुसार शासन नियमानुसार रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाव्दारे अनुकंपा उमेदवारांमधून भरण्यांबाबत चंद्रपूर शहर महापालिका विचाराधीन असल्याने दिनांक १ जानेवारी २०२१ चे तारखेवर आधारीत पात्र / अपात्र अनुकंपा धारकांची प्राथमिक स्वरुपाची प्रतिक्षा यादी महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

या यादीबाबत अनुकंपाधारकांना काही आक्षेप असल्यास दिवसांचे आंत आपला आक्षेप लिखीत स्वरुपात योग्य पुराव्यासह सामान्य प्रशासन विभागात नोंदवावे, मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास अंतीम स्वरुपाची यादी कायम करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, नोंद घ्यावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिली आहे.