मार्कंडादेव यात्रेत हरवलेली ६३ बालके पालकांच्या ताब्यात

मार्कंडादेव यात्रेत हरवलेली ६३ बालके पालकांच्या ताब्यात

गडचिरोली, दि.22: चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे नुकतेच महाशिवरात्रीनिमित्त ८ मार्च ते १७ मार्च पर्यंत मोठी यात्रा भरली होती. यामध्ये हरवलेली व सापडलेले एकुण ६३ बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देवून समुपदेश करण्यात आले.
या ठिकाणी छत्तीसगढ, मध्यप्रदेश, आणि विदर्भाच्या इतर जिल्हयातुन मोठया प्रमाणात भाविक दर्शनाला आले होते. यामध्ये पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन याच्या वतीने ते १८ वयोगटातील हरवलेल्या व सापडलेल्या बालकांकरिता मदत कक्षाची सुविधा करण्यात आली होती.
सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले याच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. यावेळी उपस्थित बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर,माजिक कार्येकर्त्य जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, निलेश देशमुख, नितीन मेश्राम सुपरवायजर, मयुरी रकतसिंगे सुपरवायजर, अलका जरुरकर केस वर्कर उपस्थित राहून बालकांचे संरक्षण करुन जनजागृती केली.