चंद्रपूर : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम Ø ईच्छुक पात्र उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Ø ईच्छुक पात्र उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.3 ऑगस्ट : कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षीत मानव संसाधनाची कमतरता आहे. यासाठी कौशल्य प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत हेल्थकेअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सदर प्रशिक्षण वैद्यकीय महाविद्यालय रामनगर, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तसेच मुल, चिमूर, राजुरा, वरोरा, सिंदेवाही, बल्लारपूर, नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुरू आहे. सदर प्रशिक्षण निशुल्क असून सदर प्रशिक्षणाकरीता शैक्षणिक पात्रता 8 वी ते पदवी पर्यंत आहे. तर वयोमर्यादा ही 45 वर्षापर्यंत आहे. तरी ईच्छुक पात्र उमेदवारांनी सपंर्क साधावा व उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

पात्र उमेदवारांनी https://forms.gle/qf97yqDj6mT8tNb36 या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी.

येथे साधा संपर्क :

अधिक माहितीसाठी 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा हॉल क्रमांक 5/6, चंद्रपूर या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.