६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ” फादर ” या नाटकाला प्रथम पुरस्कार/मूळची चंद्रपूरची असलेली अभिनेत्री बकुळ धवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रौप्यपदक जाहिर 

६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ” फादर ” या नाटकाला प्रथम पुरस्कार

मूळची चंद्रपूरची असलेली अभिनेत्री बकुळ धवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रौप्यपदक जाहिर 

मुंबई, दि. १५ मार्च: ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मांगिरीश युथ क्लब, गोवा या संस्थेच्या फादर या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या नास्ति तृष्णा समो व्याधिः या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि पोलीस कल्याण केंद्र, मुंबई या संस्थेच्या एकेक पान गळावया या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या

स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शन : प्रथमोषिक दक्षा शिरोडकर (नाटक- फादर)

द्वितीय प्रचारक- सुनिल (नाटक- एक पान गळावया) कदम तृतीयोषिक- डॉ. सुरेखा मसाळ (नाटक- नास्ति तृष्णा सोमो व्याधिः)

नेपथ्य : प्रथम पारितोषिक मोहनदास चारी (नाटक- फादर) द्वितीय पारितोषिक- प्रदीप पाटील (नाटक- एकेक पान गळावया)

तृतीय राष्ट्रोषिक- मनोज ठाकूर (नाटक-नास्ति तृष्णा सोमो व्याधिः)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- एकेक पान गळावया) द्वितीय पारितोषिक- तेजस खेडेकर (नाटक- फादर) तृतीय पारितोषिक- प्रशांत सावंत (नाटक- मॅकबेथ)

रंगभूषा : प्रथमोषिक- हर्ष निशान (नाटक- यत् न कथ्यते) विश्वोषिक- वासुदेव आंब्रे (नाटक- मॅकबेथ) तृतीयोषिक- वैभव सावंत (नाटक- चांदतारा)

संगीत दिग्दर्शन : प्रथमोषिक अनिल बडे (नाटक- नास्ति तृष्णा समोव्याधिः) द्वितीय राष्ट्रोषिक – निनाद म्हैसाळकर (नाटक- एकेक पानगळावया)

तृतीयांशोषिक- दिलीप वझे (नाटक- फादर)

उत्कृष्ट अभिनय : (रौप्यपदक)

पुरुष कलाकार :- गणेश मिंडे (नाटक- मॅकबेथ), किशोर (नाटक-इथर), सिद्धांत जगता

(नाटक- लगीन), वर्धन काम (नाटक- फदर), श्रीराम जोग (नाटक- रा+धा), श्रीकांत भगत (नाटक- अतेज्ञ), सुशील इनामदार (नाटक- एकेक पान गळावया), राज धाडवे (नाटक चंदतारा) डॉ. संतोष सूर्वे (नाटक- अंक), अमोघ बुडकुले (नाटक- यत् न कथ्यते), स्त्री कलाकार:- प्रिसिद्धी सोनावणे (नाटक-मॅकबेथ), अपका सानप (नाटक-दृष्टी), शेफाली गाडी (नाटक-फादर), ज्ञानेश्वरी मंडलीक ( नाटक-हायब्रीड), बकुळ धवने (नाटक फिअर फॅक्टर), अनुराधा वाठोडकर (नाटक-सती), स्मिता पारखे (नाटक-नाना, थोडसा ना!), श्रृती कुलकर्णी

(नाटक- नास्ति तृष्णा सोमो व्याधिः), अश्विनी तडवळकर (नाटक- समांतर), अनुजा पुरोहित (नाटक- यत्)

न कथ्यते),

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे :

श्री कलाकार :- ऋतुजा बोढे (नाटक- लगीन), वसुधा कदम (नाटक- बारस), निहारिका राजदत्त (नाटक-अतेज्ञ), सोनल शेवडे (नाटक- तथास्तु), डॉ. अनुराधा कान्हेरे (नाटक- चांदतारा).

पुरुष कलाकार :- प्रथमेश होते (नाटक- सती), कान्हा तिवारी (नाटक- नाना थोड थांबा ना! इरफान मुजावर (नाटक-ओअॅसिस), अभिजित झाडे (नाटक- खेळी मेळी), शिवराज नाळे (नाटक- नियतीच्या बैलाला).

दि. २० फेब्रुवारी ते १२ मार्च, २०२४ या कालावधीत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या अंतिम फेरीत एकूण ३८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. श्रीपाद जोशी, श्री. श्याम अधटराव, श्री. संदीप देशपांडे, श्रीमती संगीता टेकाडे आणि श्रीमती मानसी राणे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर सर्व पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या

नाट्यसंस्थांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.