महिला दिनानिमित्त माईंड पावर सेमिनार चंद्रपूर मनपाचा उपक्रम

महिला दिनानिमित्त माईंड पावर सेमिनार चंद्रपूर मनपाचा उपक्रम

 

चंद्रपूर ६ मार्च – जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बचतगटातील महिलांसाठी सत्कार, मार्गदर्शन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन यात इंटरनॅशनल मोटीव्हेशनल स्पीकर सोनिया जडाजी यांच्याद्वारे माईंड पावर सेमिनार कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत ८ मार्च रोजी मनपा राणी हिराई सभागृह येथे दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सोनिया जडाजी यांच्याद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. सोनिया जडाजी या माईंड ट्रेनर, संमोहन तज्ञ,करीयर मार्गदर्शक, कॉरपोरेट ट्रेनर तसेच इंटरनॅशनल मोटीव्हेशनल स्पीकर आहेत.देशभरात विविध जागी त्यांनी मार्गदर्शक म्हणुन व्याख्यान दिले आहेत.

अदिशक्तीचे रुप असलेल्या स्त्रीयांमध्ये सर्व विश्व सामावले आहे. अशा स्त्रीत्वाचा गौरव व्हावा यासाठी सदर कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा,महिलांचा सत्कार,मेळावा, जनजागृती व विविध विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.