भंडारा | जिल्हाभर हर घर तिरंगा कार्यक्रमाचा जागरअमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

भंडारा | जिल्हाभर हर घर तिरंगा कार्यक्रमाचा जागरअमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

भंडारा, दि. 5 :भारतिय स्वातंत्रयाला 75 वर्ष पुर्ण झाल्याबददल आजादी का अमृतमहोत्सव आणि हर घर तिरंगा कार्यक्रमाबाबत प्रचार प्रसार सुरू आहे. त्यामध्ये विविध उपक्रम घेण्यात येत आहे. मोहाडी तालुक्यात आज मोठया प्रमाणावर बाईक रॅली काढण्यात आली. गांधी विद्यालय विरली खंदा, (पवनी) येथे आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्या मध्ये वर्ग 5 ते 8 गटात 15 विद्यार्थी व वर्ग 9 ते 10 गटात 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता

जिल्हा परिषद हायस्कूल सानगडी येथे समूहगित स्पर्धा घेण्यात आली.त्यामध्ये मोठया प्रमाणावर विदयार्थ्यानी सहभाग घेतला होता. तर घर, शासकीय निमशासकीय कार्यालयासोबत साकोली तालुक्यातील पेट्रोलपंपावर खासगी गाड्यांवर हर घर तिरंगाविषयी जाणीव जागृती करणारे स्टिकर लावण्यात आली. जिल्हा परिषद पूर्वप्राथमिक शाळेच्या वतीने गावात गोबरवाही येथे आज सकाळी शालेय विदयार्थ्याची प्रभात फेरी काढण्यात आली.