खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत पीएम सुरज पोर्टल चे उद्घाटन

खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत पीएम सुरज पोर्टल चे उद्घाटन

          भंडारा, दि.13.पंतप्रधान सामाजिक उन्नती आणि रोजगाराधारित जनकल्याण (पीएम-सूरज) राष्ट्रीय पोर्टलचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज डिजिटल पद्धतीने या झाले.

         या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातून नियोजन सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने खासदार सुनील मेंढे ,जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश तैकर, महात्मा फुले मंडळाचे व्यवस्थापक श्री. खोब्रागडे, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन सिद्धार्थ मेश्राम आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

        यावेळी सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत सर्व विविध महामंडळाच्या योजनांचे लाभार्थी  तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.

         यावेळी महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांची लाभ वाटप खासदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला.