गडचिरोली जिल्ह्यात खासदार अशोक नेते यांच्याकडून अयोध्येच्या अक्षतांचे वाटप…

गडचिरोली जिल्ह्यात खासदार अशोक नेते यांच्याकडून अयोध्येच्या अक्षतांचे वाटप…

श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिर प्राण प्रतिष्ठा अक्षतांचे वाटप तालुका धानोरा येथील वार्ड क्रमांक ०५ बाजार चौकापासून दुर्गामाता मंदिर ते हनुमान मंदिर पर्यत कलशयात्रेसह रॅली, दिंडी, भजनाने व श्रीरामाच्या जयघोषाने खासदार अशोक नेते यांचे कडून श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अयोध्येच्या अक्षतांचे वाटप केलेे.

यावेळी धानोरा तालुकाध्यक्षा लताताई पुंन्घाटे,भाजपा जेष्ठ नेते शशिकांत साळवे,शहराध्यक्ष सारंग साळवे,महामंत्री विजय कुमरे, मुन्ना भाऊ चंदेल ,अनंत साळवे ,किरण बर्वे ,लीना साळवे , शेरकी ताई , साजन गुंडेवार, संजय कुंड,राकेश दास, सुभाष खोबरे , निपेन सरकार ,ताराबाई कोटांगले,भूमालाताई परचाके, राकेश खरवडे,लंकेश म्हशाखेत्री , नाजूक उंदीरवाडे,तसेच भजन मंडळी व महिला नागरिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-
*गडचिरोली शहरात खा.नेते यांच्याकडून अक्षतांचे वाटप….*

गडचिरोली शहर परिसरातील शाहुनगर व कॅम्प एरिया या ठिकाणी अक्षतांचे वाटप..

येत्या २२ जानेवारी ला भगवान श्रीराम वाटत जन्मभूमी अयोध्याला मुर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी भगवान श्रीरामाचे पूजन व्हावे, भजन, व कीर्तन व्हावे आणि २२ जानेवारी २०२४ ला प्रत्येकांच्या घराघरांमध्ये रांगोळी, दिवे लावून दिवाळी सणासारखा जल्लोउत्सव साजरा करावा. अयोध्येला दर्शनांसाठी जाण्याकरिता अयोध्या वरून आलेल्या अक्षतांचे पुजन करून देवघरांसमोर किंवा मंदिरामध्ये अर्पण करावे.यासाठी प्रत्येक घरोघरी अक्षतांच्या वाटपाचा कार्यक्रम संपूर्ण भारतभर, विश्वभर सुरू आहे. हा अभियान ०१ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत असल्यामुळे गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहर परिसरातील शाहुनगर,कॅम्प एरिया या ठिकाणी करण्यात आले. सोबत जिल्हा संघ चालक घिशुलांलजी काबरा,किसान आघाडी चे प्रदेश सरचिटणीस रमेश भूरसे,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,युवा नेते दिपक सातपूते,गणेश नेते, इत्यादींनी गडचिरोली शहरात घराघरांत फिरून अक्षदा वाटपाचा कार्यक्रम केला.

हे अभियान पूर्ण करण्यासाठी नागरिक जनतेनी आपणही या अभियानात सहभागी होऊन अक्षदा वाटप करावे. असे आवाहन ही याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.