प्लॅस्टिक व्यवस्थापन काळाची गरज – नुतन सावंत

प्लॅस्टिक व्यवस्थापन काळाची गरज – नुतन सावंत

प्रत्येक तालुक्यात उभारणार प्लॅस्टिक युनिट

चंद्रपुर  दिनांक – 11/01/2023 वाढता प्लॅस्टिक वापर हे पर्यावरणाला घातक असुन, प्रत्येक गावात प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. वापर करण्यात आलेल्या प्लॅस्टिकचे योग्य पध्दतीने व्यवसथापन होणे काळाची गरज आहे. असे मत जिल्हा परिषद मध्ये आयोजित प्लॅस्टिक व्यवस्थापन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नुतन सावंत यांनी व्यक्त केले.

 

गावा – गावात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक चा वापर होत असुन, गावस्तरावर प्लॅस्टिक संकलित करुन , योग्य पध्दतीने प्लॅस्टिक व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सुरवातीला एक प्लॅस्टिक युनिट उभारण्यात येणार आहे. सदर युनिट तालुक्यातील ज्या गावात उभारणार आहे . त्यागावातील सरपंच व ग्रामसेवक यांना माहीती होण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत गाव स्तरावर निर्माण होणारे प्लॅस्टिक युनिट कशा प्रकारचे राहील. युनिट अंतर्गत आजुबाजुच्या गावातील कचरा संकलन पध्दती कशी राहील , यामधुन गावस्तरावर निर्माण होणारी दृष्यमान स्वच्छता व यामुळे गावक-यांना होणारे फ़ायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्लॅस्टिक युनिट स्थापन करण्यासाठी जिल्यामधुन पंधरा गावांची निवड करण्यात आलेली असुन, यामध्ये बल्लारपुर तालुक्यातील विसापुर,भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी,चंद्रपुर तालुक्यातील मोहर्ली, चिमुर तालुक्यातील खडसंगी, गोडपिपरी तालुक्यातील धाबा, जिवती तालुक्यातील पाट्ण , कोरपना तालुक्यातील आवाळपुर,मुल तालुक्यातील कोसंबी, नागभिड तालुक्यातील वाढोना, पोभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा, राजुरा तालुक्यातील बामनवाडा, सावली तालुक्यातील पाथरी, सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाठ, वरोरा तालुक्यातील माढेळी यागावांची निवड करण्यात आली आहे. कार्यशाळेला पधंरा गावचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

प्लॅस्टिक युनिट मुळे गावस्तरावरील प्लॅस्टिक हद्दपार करणे गावक-यांना सोपे होणार असुन, नियमित प्लॅस्टिक संकलन व त्याचा पुनरवापर यावर भर दिला जाणार आहे. यामधुन प्लॅस्टिक व्यवस्थापनाचे प्रत्येक तालुक्यात रोल मॉडल उभे राहणार आहे.- नुतन सावंत,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता.