दावे व हरकतीबाबत आक्षेप, तक्रारीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून 8149557108 व्हाट्सअँप क्रमांक कार्यान्वित Ø नागरिकांच्या शंकाचे होणार निरसन

दावे व हरकतीबाबत आक्षेप, तक्रारीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून 8149557108 व्हाट्सअँप क्रमांक कार्यान्वित
Ø नागरिकांच्या शंकाचे होणार निरसन

चंद्रपूर दि. 30 नोव्हेंबर : 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. दावे व हरकती सोमवार, दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकालात काढण्यात येतील. तर बुधवार दि. 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

दावे व हरकतीबाबत काही आक्षेप तथा तक्रारी संदर्भात जिल्ह्यासाठी 8149557108 हा व्हाट्सअँप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. यावर निवडणुकीसंबंधी संदेश सुद्धा स्वीकारले जातील. मतदारांना या क्रमांकावर तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्या शंकाचे निरसन करून घेता येईल. तसेच 1950 हा टोल फ्री क्रमांक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तरी, ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घ्यावे व उपलब्ध संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.