मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना किमान दिलेली आर्थिक मदत वाढवून देऊन वारसदार यांना कंपनीमध्ये समाविष्ट करावे

चामोर्शी तालुक्यात ट्रक अपघातात झालेल्या मृतकांच्या कुटुंबीयांची मार्कंडा देवस्थान येथे खासदार अशोकजी नेते यांची सांत्वन भेट.

उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या कंपनीने मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना किमान दिलेली आर्थिक मदत वाढवून देऊन वारसदार यांना कंपनीमध्ये समाविष्ट करावे – खासदार अशोक नेते

चामोर्शी:- सुरजागड प्रकल्पात उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील तिन जणांना चिरडल्याने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील जंधलवार परिवारावर मोठा आघात झाला. यात भावना नरेश जंधलवार, प्रियंका गणेश जंधलवार, रुद्र गणेश जंधलवार यांचे जागीच दुःखद निधन झाले. त्यामुळे सुरजागड येथे उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या ट्रक कंपनीने या अपघातात मृत पावलेल्या परिवारातील सदस्यांना आर्थिक मदत तर जखमी झालेल्याला वैद्यकीय उपचारांचा खर्च कंपनीने करावा. अशी मागणी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे
अशोकजी नेते यांनी केली. त्यांच्या मागणीला मान्य करीत सुरजागड कोनसरी लोह प्रकल्प वाहतूक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या परिवारातील सदस्यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना आर्थिक मदत केली. पण हि आर्थीक मदत फार कमी प्रमाणात होती ती वाढवून परिवारातील एका सदस्याला नोकरी तर अपघातात जखमी असलेल्यांच्या उपचाराचा खर्च कंपनी करावा असे कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले
मार्कंडा देवस्थान येथील कुटुंबातील तिघांचा मृत्यू पावलेल्या संबधीतची माहिती खासदार अशोकजी नेते यांना मिळताच आज तत्काळ मृतकांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट देऊन यावेळी आर्थीक मदत देण्यात आली.
यावेळी मार्कंडा चे सरपंच्या सौ. संगीता ताई मोगरे,उपसरपंच जूनघरे,पोलीस पाटील आरती आभारे, देवस्थान ट्रस्ट सचिव मृत्युंजय गायकवाड व गावकरी यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांशी संवाद साधला व समस्या जाणून घेत कंपनीच्या वरीष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली व दिलेली आर्थिक मदत ही वाढवून देण्याची मागणी करून सक्त ताकीद दिली व कंपनीचे संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी यांना तत्काळ भेट घेण्याच्या सुचना केल्या.

याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ वरघंटे भाजपा सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ पिपरे, भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर ,शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम , जेष्ठ नेते माणिक कोहळे,युवा नेते नरेश अलसावार, नीरज रामानुजवार,रेवनाथ कुसराम,भारत धोडरे,राजू धोडरे अंकित फाले,सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.