नमो युवा महासंमेलन कार्यक्रमासाठी खासदार नेते यांनी हिरवी झेंडी दाखवून गाड्यांचा ताफा रवाना केला.

नमो युवा महासंमेलन कार्यक्रमासाठी खासदार नेते यांनी हिरवी झेंडी दाखवून गाड्यांचा ताफा रवाना केला.

राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्येने युवकांचा सहभाग 

(गडचिरोली दिं. ०४ मार्च)
गडचिरोली:आज दि.४/३/२०२४ ला सकाळी भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली च्या वतीने राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी एकत्र येऊन गडचिरोली शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालया जवळ न भूतो न भविष्यती असा युवाशक्तीचा जागर होणार आहे.यात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष @Tejasvi_Surya यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या संमेलनाला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda जी उपस्थित राहणार आहेत. या साठी गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी युवा शक्तीच्या जागरात उपस्थित राहण्यासाठी मोठया संख्येने रवाना झाले.
याकरिता गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी हिरवी झेंडी दाखवुन नागपूर ला रवाना केले.
याप्रसंगी शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून ते इंदिरा गांधी चौकापर्यंत डिजे च्या तालात पाययात्रा काढून युवकांचा आत्मविश्वास वाढवित उत्साहद्धिगुणी केला.

या वेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,ज्येष्ठ कार्यकर्ते लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, महामंत्री गोविंद सारडा ,महामंत्री प्रकाश गेडाम,महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, प्रदेश सदस्य रवी ओल्लालवार,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चा च्या गिताताई हिंगे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री त्रिषा डोईजड, कविता उरकुडे, अर्चना निंबोळ, पुष्पा करकाडे वैष्णवी नैताम, केशव निंबोळ,मंगेश रणदिवे, धनंजय सहदेवकर,गणेश दहेलकर,अंकुश पवार, निता उंदिरवाडे, सीमा कन्नमवार, पूनम हेमके, कोमल बारसागडे, स्वाती चंदनखेडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.