कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्ग तजमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्ग तजमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.08: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहिन कुटूंबाला शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे. त्यांनी विकत असलेल्या जमिनीचा 7/12, जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमिनीचा तपशिल (नमुना 8 अ), जमीन मोजणीची क प्रत, गांव नकाशा, 100 रुपयाचे स्टॅम्पपेपरवर शपथपत्र इ. माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. शासन निर्णय, दि. 14 ऑगस्ट 2018 नुसार खरेदीची कार्यवाही करण्यात येईल. अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.