नारीशक्‍तीचा देशाच्‍या वाटचालीसाठी मुख्‍य हातभार – हरीश शर्मा

शक्‍तीवंदन उपक्रमाअंतर्गत मॅरॉथॉन स्‍पर्धा संपन्‍न

नारीशक्‍तीचा देशाच्‍या वाटचालीसाठी मुख्‍य हातभार – हरीश शर्मा

चंद्रपूर – भारतीय जनता महिला मोर्चाच्‍या माध्‍यमातुन शक्‍तीवंदनाच्‍या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशासह चंद्रपूर जिल्‍हयात आजपासून सुरूवात करण्‍यात आली. या कार्यक्रमांतर्गत आज चंद्रपूर जिल्‍हयातील दुर्गापूर येथे मुली व महिलांची मॅराथॉन स्‍पर्धा घेण्‍यात आली. या मॅराथॉन स्‍पर्धेच्‍या अंतर्गत असंख्‍य मुली व महिलांनी सहभाग नोंदविला.

रन फॉर नॅशन, रन फॉर मोदी या आशयाचा संदेश भारतीय जनता पार्टी जिल्‍हा चंद्रपूरचे अध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी सर्व स्‍पर्धकांना दिला. धावणे या व्‍यायामाचा प्रकार अंगीकृत करून आरोग्‍य सुदृढ करण्‍याचे मौलीक मार्गदर्शन भाजपा जिल्‍हा महामंत्री तथा नारीशक्‍ती वंदन मुख्‍य संयोजक डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. या मॅराथॉन स्‍पर्धेत मुलींमधून प्रथम क्रमांक वैष्‍णवी कुनघाडकर यांनी तर काजल रणदिवे व शानवी पवार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. महिलांमध्‍ये पहिला क्रमांक माधुरी मुनघाटेदुसरा अश्विनी पाकमोडे तर तिसरा ज्‍योती मोहितकर यांनी पटकाविला.

या शक्‍तीवंदन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्‍या म्‍हणून आयएमए च्‍या अध्‍यक्षा डॉ. किर्ती साने ह्या उपस्थित होत्‍या. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महाराष्‍ट्र प्रदेश महिला मोर्चा महामंत्री कु. अल्‍का आत्रामप्रदेश सचिव विद्याताई देवाळकरजिल्‍हयाचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारेसंध्‍याताई गुरनुलेरामपाल सिंहमहिला मोर्चा अध्‍यक्षा वंदना शेंडेमाजी महामंत्री नामदेव डाहूलेमहिला मोर्चा महामंत्री निलम सुरावारपोंभुणाच्‍या नगराध्‍यक्षा सुलभाताई पिपरेमहिला मोर्चा महामंत्री प्रियंका लांबटउपाध्‍यक्ष भाजपा वंदना सिन्‍हा यांनी विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी राकेश बोमनवारश्रीनिवास जंगमरूद्रनारायण तिवारीमयुर भोकरेशोभा पिदुरकरकोमल भरगडेकिर्ती कातोरेअरूणा चौधरीकेमा रायपुरेगिता सिंगगीता रणदिवे यांनी अथक परिश्रम घेतले.