हिमोफीलिया डे केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

हिमोफीलिया डे केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

               भंडारा,दि.28 : हिमोफिलिया हा अत्यंत गंभीर आनुवंशिक आजार आहे.काल दि. 26 फेब्रुवारी,2024 रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते हिमोफीलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.   तसेच भंडारा जिल्हयात सुद्धा हिमोफीलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे करण्यात आले.या कार्यक्रमास कार्यालयाचे  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते डॉ. दीपक निर्वाण, लक्ष्मी तनिकोंढा ,रोहिणी पवार,चंदा शेंडे व काही कर्मचारी उपस्थित होते.

 या आजारामध्ये रक्त गोठण्यासाठी फॅक्टर आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्हामध्ये ही आरोग्य सेवा पुरविल्या जात होते परंतु आता सर्व जिल्ह्यात ही आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.