सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

भंडारा दि. 5 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन 1 ते 4 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे करण्यात आले होते. त्या स्पर्धेतील विजेत्यांना नुकताच बक्षीत वितरण समारंभ पार पडला.

या स्पर्धेत 14 वर्ष मुलांचे 16, 17 वर्ष मुलांचे 18 व 17 वर्ष मुली 9, असे एकूण 43 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. प्रकाश सिंग, सचिव भंडारा जिल्हा असोसिएशन भंडारा, मनिष मोगरे, रॉबीन सोनटक्के, मानव मोगरे, साहील कटकवार व स्पर्धा प्रमुख भोजराज चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेच्या अंतीम सामन्यात 14 वर्ष मुलांच्या गटात महर्षी विद्यामंदीर फुलमोगरा विजयी व सेंट पिटर स्कुल, बेला उपविजयी त्याचप्रमाणे 17 वर्ष मुलांच्या गटात सेंट पिटर स्कुल, बेला विजयी व सन्नीज स्प्रिंग डेल स्कुल, भंडारा उपविजयी, 17 वर्ष मुलींच्या गटात रॉयल पब्लीक स्कुल, भंडारा विजयी व सन्नीज स्प्रिंग डेल स्कुल, भंडारा उपविजयी झालेल्या आहे. विजयी संघ विभागीय स्पर्धेकरीता भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. विजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेचे पंच प्रमुख डॉ. प्रकाश सिंग, यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून मनिष मोगरे, रॉबीन सोनटक्के, मानव मोगरे, साहील कटकवार यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेचे यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.