मतदार साक्षरता  क्लबद्वारे मतदार जागृती

मतदार साक्षरता  क्लबद्वारे मतदार जागृती

मोहगाव देवी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जनजागृती

            भंडारा दि.13- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाद्वारे मतदार जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या आदेशान्वये स्वीप मतदार जागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे व त्यांच्या अधिनस्त एकूण दहा जणांची चमू कार्यरत आहे. या चमूमार्फत जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदार साक्षरता क्लब म्हणजे इलेक्ट्रॉलर लिटरसी क्लबद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदानाची प्रक्रिया समजून सांगण्यात ही चमू यशस्वी झालेली आहे.

           जिल्ह्यात मतदार जागृती कार्यक्रम एक जानेवारीपासून राबविण्यात येत आहे .भारत निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये स्वीपमार्फत मतदार साक्षरतेसाठी संपूर्ण मतदारसंघ प्रक्रिया इव्हीएम मशीन वर मतदान करण्याची प्रक्रिया तसेच मतदारांना मतदारांचे हक्क व अधिकार निवडणूक पद्धतीची संपूर्ण कार्यवाही तसेच मतदानाविषयीचे नियमाबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात येत आहे .

             नुकतेच भंडारा जिल्ह्यात भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 100 गुण अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . त्यांनी मतदान प्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती स्वीप चमकून घेतली. यावेळेस प्राध्यापक बहुजन श्रीरामे, जिल्हा समन्वयक प्राध्यापक प्रशांत वाल्हे, विद्यार्थी प्रतिनिधी रोहित ऊके, विद्यार्थीनी प्रतिनिधी दिशा लेंडारे यांनी याबाबत महाविद्यालय विद्यार्थ्यांना व मोहगाव देवी येथील ग्रामवासीयांना माहिती दिली.