chandrapur I मंत्राने कोरोना बरा होणार नाही! – हरिभाऊ पाथोडे


मंत्राने कोरोना बरा होणार नाही! – हरिभाऊ पाथोडे

 गायत्री मंत्राने कोरोना चा उपचार केला जाऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या एक संशोधन केलं जात आहे. हे काही साधंसुधं संशोधन नाहीये. तर ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यावर सध्या संशोधन करत आहे. अशी बातमी आहे. या संशोधनाला केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने फंडीग केलेलं आहे.

विज्ञान मंत्रालयाकडून केल्या जाणाऱ्या या अध्ययनामागचा हेतू हा आहे की, मंत्राने रोग बरे होतात का? असा आहे.सुमारे सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी “जरी मंत्राची वैरी मरे। कटी का बांधावी कट्यारे। रोग जाय दुध-साखरे,निंब का पियावा? असा प्रश्न उपस्थित केला.आपण एकविसाव्या शतकात असताना अशा भाकड संशोधनावर विश्वास ठेवतो.एकीकडे आरोग्य व्यवस्थेवर,लसीकरणावर खर्च करण्याची गरज असताना,चुकीच्या संशोधनावर पैसे उधळत आहोत. तरी याचा पुनरावलोकन शासनाने करावे, मंत्राने कोणतेही रोग बरे होत नाही! असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.