पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला निंदनीय..! / पुरोगामी पत्रकार संघाने केला तीव्र निषेध

पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला निंदनीय..! / पुरोगामी पत्रकार संघाने केला तीव्र निषेध

पुण्याच्या ‘निर्भय बनो’ सभेत जातांना पत्रकार निखिल वागले यांच्या वर नियोजित पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांडून नियोजित भ्याड हल्ला करण्यात आला.सत्तेला आरसा दाखवणाऱ्या पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला हाणी पोहोचविण्याचे दुष्कृत्य असून,या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत,असे मत पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक तथा पुरोगामी साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.
वरिष्ठ पत्रकार निखिल वाघळे ‘निर्भय बनो’ अंतर्गत मुंबईहून पुण्याला एका सभेला संबोधित करण्यासाठी निघाले होते.दरम्यान पुण्यात हल्लेखोरांकडून त्यांच्या गाडीचा पिच्छा करून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला.वेळेवर उपस्थित असलेल्या जागरूक नागरिकांच्या सतर्कते मुळे त्यांचा जीव वाचला…पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात पत्रकारच सुरक्षित नसतील,आणी सत्याची बाजू मांडणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रचंड दुःखद असल्याची खंत नरेंद्र सोनारकर यांनी मांडली आहे.हे राज्य छत्रपती शिवराय,महात्मा फुले,डॉ.आंबेडकर आणी विविध सुधारणावादी संत महात्म्यांच्या विचाराने प्रेरित असून,त्यामुळेच महाराष्ट्राला ‘पुरोगामी’ हे बिरुद वापरले जाते.मात्र याच पुरोगामी महाराष्ट्रात असले भ्याड प्रकार घडत असतील तर ते निंदनीयच आहे.त्यामुळे या हल्ल्याचा निषेध केला तेवढा कमीच आहे….
पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर नियोजित भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे,दहशत निर्माण करणे अशा विविध कलमा अंतर्गत गुण्याची नोंद करावी,अन्यथा पुरोगामी पत्रकार संघ राज्यभर निदर्शने आणी आंदोलन करेल,असा इशाराही सोनारकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.