मातोश्री सोनाबाई गोस्वामी मुलांचे वसतिगृहाची शासन मान्यता रद्द

मातोश्री सोनाबाई गोस्वामी मुलांचे वसतिगृहाची शासन मान्यता रद्द

भंडारा, दि. 13  : इंदिरा शिक्षण प्रसार संस्था भिलेवाडा या संस्थेव्दारे संचालित मातोश्री सोनाबाई गोस्वामी मुलांचे वसतिगृह म्हाडा कॉलनी, खात रोड, भंडारा या वसतिगृहाची सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षापासून शासनाने मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे हे वसतिगृह शासनमान्य असल्याचे समजून कोणत्याही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्यास तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित संस्था तसेच प्रवेश घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक जबाबदार राहतील, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी कळविले आहे.