हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम

चंद्रपूर:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्यवर्धक हळदिचे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ग्रामिण देवराव भोंगळे, माजी नगराध्यक्ष विजय राऊत,    खुषाल बोंडे, महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, राजेश मून, माजी महापौर तथा महिला आघाडी महानगर अध्यक्ष अंजली घोटेकर, तथा हंसराज अहीर मित्रपरीवार यांनी केले आहे.
कोविड-1़9 काळात काढा व हळदिचे दूध गुणकारी तसेच प्रतिकारशक्ती वाढविणारे असल्याने हळदिचे दूध वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यालय जवळ, कस्तुरबा रोड, नेताजी सुभाष चैक,बंगाली कॅम्प, नेताजी चैक,बाबुपेठ, शहीद भगतसिंग चैक, एस.टी. वर्कशाॅप चैक, तुकुम येथे तर तालुका क्षेत्रात वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, बल्हारशाह, मुल, घुग्घुस या सर्व ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडी, शेतकरी आघाडी, अनुसुचित जाती मोर्चा, अनुसुचित जमाती मोर्चा, ओबिसी आघाडी, भटके-विमुक्त जाती मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, कामगार आघाडी व  इतर सर्व आघाडी, मित्र परीवार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रयत्न करीत असून नागरीकांनी मोठ्या संख्येने आरोग्यवर्धक हळदिचे दुध सेवनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.