अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

चंद्रपूर, दि. 19: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार, दि. 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन  व  जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कामगार आयुक्त आणि डब्ल्यूसीएलचे महाप्रबंधक यांच्यासमवेत बैठक.  तसेच दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून अहेरीकडे प्रयाण करतील.