अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

अनोळख मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 08: सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रुग्णालयाच्या आवारात 65 वर्षीय अनोळखी मृतक इसम झोपलेल्या स्थितीत आढळून आला. त्यास रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

सदर व्यक्तीचे वय 65 वर्ष असून उंची 5 फुट 2 इंच, सडपातळ बांधा, रंग गवाळ, डोक्यावर काळे पांढरे केस, दाढी मिशी पांढरी बारीक वाढलेली, उजव्या हातात लाल रंगाचा धागा बांधलेला आहे. तसेच अंगात हिरवट रंगाचा शर्ट, काळसर रंगाचा फुलपॅन्ट परिधान केला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.