उमेद तर्फे भंडारा येथे जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळा उत्साहात,100 कोटींचे होणार कर्ज वितरण

उमेद तर्फे भंडारा येथे जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळा उत्साहात,100 कोटींचे होणार कर्ज वितरण

उत्कृष्ट बँकर्स उमेद तालुका कॅडरचा सन्मान

भंडारा दि 20 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळेचे आयोजन जि.प. सभागृह येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान सहसंचालक प्रदिप चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश तईकर, जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड संदिप देवगिरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.म.स. बँक भंडारा संजय बरडे, NRLM प्रशिक्षक गोरख कांबळे, उमेद भंडाराचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गौरव तुरकर तसेच जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन दिलीप पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक (BMM ) तालुका व्यवस्थापक (BM) आर्थिक समावेशन व बैंक सखी, आर्थिक साक्षरता सखी, प्रभाग समन्वयक यावेळी उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये सन 2021-2022 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकर्सना तसेच उमेद तालुका टिम व कॅडर यांना सन्मानित करण्यात आले. सन 2022-23 च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा अभियान सहसंचालक प्रदिप चौधरी यांनी जिल्ह्यांतील बँकेला आवाहन करताना बँकांनी सर्व महिला स्वयंसहायता समूह यांना आरबीआय च्या निर्देशाप्रमाणे लिंकेज करण्यास सांगितले. जिल्ह्यात स्वयं सहायता समूहातील बचत गट तसेच उमेद यंत्रणेच्या कार्यक्रमांमध्ये महिलांना बळ मिळत असल्याचे यावेळी सांगितले.

2021-22 मध्ये आम्ही 80 कोटीचे उद्दिष्ट साध्य केलं असून या वर्षीदेखील उमेद व सर्व बँकांच्या सहकार्याने 100 कोटीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. शंभर कोटीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करु. – गौरव तुरकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद- भंडारा.