स्पर्श कुष्ठरोग जनजागृतीसाठी धावले भंडारावासी / Run For Leprosy  मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

स्पर्श कुष्ठरोग जनजागृतीसाठी धावले भंडारावासी

Run For Leprosy  मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

                भंडारा, 7 :- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार जिल्हयात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. स्पर्श कुष्ठरोग अभियानानिमित्त जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

          जिल्हास्तरावर स्पर्श कुष्ठरोग जनजागृती करीता 7 फेब्रुवारी रोजी Run For Leprosy अंतर्गत जिल्हास्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रेल्वे मैदान, खात रोड भंडारा येथुन करण्यात आले. खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटक म्हणुन डॉ.अभय हातेकर, अधिष्ठाता, वैद्यकिय महाविद्यालय भंडारा, डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.भंडारा, डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय भंडारा यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरवात केली.

          प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.सचिन चव्हाण, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.भंडारा, डॉ.सिमा यादव, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) भंडारा, डॉ.शंकर कैकाडे, तालुका आरोग्य अधिकारी, भंडारा, क्रिडा अधिकारी कार्यालयातील योगेश खोब्राकडे, पंचाबुध्दे उपस्थित होते.

               स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत Run For Leprosy अंतर्गत जिल्हास्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत मुले आणि मुली या गटातील स्पर्धकांना प्रथम-रु.4000, द्वितीय-रु.2500 आणि तृतीय-रु.1500 रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहानात्मक प्रशस्तीपत्र देण्यात आले.  जिल्हास्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजनात सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयातील निखाडे, सोनवाने, पडोळे, भांडारकर, भुरे, वासनिक, खंडारे, गोरठे, ढबाले आदी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य  केले.