आदर्श आचारसहींतेबाबत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण

आदर्श आचारसहींतेबाबत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण

             भंडारा, दि.28 :आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने  अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणातील विषयानुरूप जिल्हापातळीवरील शेवटचे आदर्श आचारसहिंतेबाबत

          प्रशिक्षण आज नियोजन सभागृहाच्या हॉलमध्ये घेण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी , अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे,उपजिल्हाधिकारी लीना फलके,जे.पी.लोंढे ,उपजिल्हाधिकारी निवडणुक प्रशांत पिसाळ,उपवनसंरक्षक राहूल गवई तसेच पोलीस विभागाचे सुशांत सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.

          यावेळी  निवडणुक कार्यक्रम आयोगाने जाहिर करताच आदर्श आचारसहिंतेच्या अंमलबजावणीबाबत असलेल्या सूचना व त्यावर सविस्तर मार्गदर्शन  केले. आदर्श आचारसहिंता म्हणजे राजकीय पक्षांच्या सहमतीने आणि भारत निवडणुक आयोगाव्दारा लागू केलेल्या निकषांचा संच  असतो.त्यामध्ये  आयोगाव्दारे निवडणूक वेळापत्रक जाहिर केल्यानंतर तात्काळ प्रभावाने लागू होते. निवडणुक प्रक्रीयापुर्ण होईपर्यत आदर्श आचारसंहिता लागू राहते.

         त्यामध्ये कामाची अंमलबजावणी,प्रचार प्रसीध्दी आणि विभागांनी अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत श्री.रणदिवे यांनी मार्गदर्शन केले.

         दुष्काळग्रस्त म्हणून घेाषित झालेल्या भागात आयोगाने काही बाबींना तात्पुरती मान्यता दिली आहे.त्यामध्ये पाण्याच्या टॅकरने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,तसेच गुरांसाठी चा-यांची तरतुद यासह अन्य बाबी समाविष्ट  आहेत.शासकीय वाहने तसेच विश्रामगृहाचा वापर आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

           यावेळी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुर्तकोटी यांनीही मार्गदर्शन केले.त्यांनतर विभागप्रमुखांनी विचारलेल्या प्रश्न व अडचणीचे निवारण केले.या प्रशिक्षणाला सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.