प्रत्येकाने गोळ्या खाऊन हत्तीरोगापासून सुरक्षित राहावे

प्रत्येकाने गोळ्या खाऊन हत्तीरोगापासून सुरक्षित राहावे

गडचिरोली, दि.06:  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 10 ते 23 फेबुवारी 2024 दरम्यान चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्यात हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहीम आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांचे टिम द्वारे  नागरिकांना प्रत्यक्ष हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. वरील दोन्ही तालुके हे हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतून 100 टक्के नागरिकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीकोनातून आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांचे द्वारे दिवस पाळीत किवा रात्रो पाळीत जेवण झाल्यानंतर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी व कार्यालये इत्यादी ठिकाणी बूथ चे नियोजन व गावोगावी गृहभेटी द्वारे प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालण्यात येतील. हत्तीरोग विरोधी गोळ्या हे सुरक्षित असून ते सेवन करणे हा हत्तीरोग संसर्ग रोखण्याचा एकमेव पर्याय आहे.
हत्तीरोग दूरीकरणाकरिता चामोर्शी व आरमोरी तालुक्यात 10 ते 23 फेबुवारी या कालावधीत सदर मोहीम सुरु होत असल्याने 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेले आहे.
वरील दोन्ही तालुक्यातील सर्व नागरिकांनी हत्तीरोग विरोधी गोळ्याचे सेवन  करावे व हतीरोगाचे उच्चाटन करावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार तर प्रास्ताविक अशोक एडलावार, आरोग्य पर्यवेक्षक यांनी व आभार प्रदर्शन विलास नैताम, आरोग्य सहाय्यक यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.