जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्यावतीने विविध विभागात संवेदीकरण कार्यशाळा संपन्न

जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय, गडचिरोली
यांच्यावतीने विविध विभागात संवेदीकरण कार्यशाळा संपन्न

गडचिरोली, दि.06:  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांचे मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हयातील विविध क्षेत्रात एचआयव्ही/एड्स या विषयावर संवेदीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संवेदीकरणाचे मुख्य उद्देश एचआयव्ही प्रसाराचे मार्ग एचआयव्ही बाबत समज गैरसमज, कलंक व भेदभाव मिटविणे. एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही बाबतच्या उपलब्ध सोई सुविधा, एचआयव्ही/ एड्स ( प्रतिबंध व नियंत्रण) कायदा २०१७ या विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
रेल्वे स्टेशन वडसा :-दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी रेल्वे कर्मचारी यांचे सर्वेदीकरण करण्यात आले. त्यामध्ये प्रमुख उदिष्ट रेल्वेचे कामगार भारतामध्ये रेल्वेचे जाळे खुप मोठे असल्याने अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणावर त्यापैकी तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगार (लोडर,अनलोडर, कुली व फोरमन इ. ) वर्ग मोठया प्रमाणात आहे. एचआयव्ही एड्सचा कामाच्या जगात मोठा धोका आहे व त्याचा सेवा विभागावर परिणाम होऊ शकतो. एचआयव्ही एड्समुळे होणा-या कलंक व भेदभावामुळे काही तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांना नोकरी व रोजगार गमावणे तसेच काहीना उपजिवीकेच्या संधी नाकाराल्या जाऊ शकतात. आणि HIV ACT 2017 SunBoard प्रदान करण्यात आले.
औद्योगीक क्षेत्र : दि. १६ जानेवारी २०२४ रोजी औद्योगिक कारखाना श्री साई सिमेंट ब्रिक्स कारखाना (MIDC) गडचिरोली या कारखान्यातील कामगारांचे सर्वेदीकरण करण्यात आले. त्यामध्ये ILO पॉलीसी मधील कलंक व भेदभाव यांचे निमुर्लन तसेच एचआयव्ही / एड्ससह जगणा-या कामगारांना नोकरीची शाश्वती व त्यांच्या उपचार याबाबत माहिती देण्यात आली आणि HIV ACT 2017 Sun Board प्रदान करण्यात आले.
शालेय शिक्षक वर्ग :- दि. १९ जानेवारी २०२४ रोजी नवजीवन पब्लीक स्कुल आणि दि.०३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रज्ञा संस्कार स्कुल, गडचिरोली येथे शालेय शिक्षक वर्गाचे सवेदीकरण करण्यात आले. त्यामध्ये किशोर वयीन जिवन कौशल्य शिक्षण कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स माहितीचा समावेश करणे (वयात येताना होणारे बदल, बाल लैंगीक शोषन, ड्रग युजर्स इ.) बाबत माहिती देण्यात आली.
पंचायत समिती दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी पचांयत समिती गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वेदीकरण करण्यात आले त्यामध्ये पचांयत समितीच्या विविध योजनामध्ये जसे की, मनरेगा, विधवा पेन्शन योजना, घरकुल योजना, संजय गांधी निराधर योजना, इ. या योजनामध्ये एचआयव्ही/एड्स सह जगणा-या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावेत कलंक व भेदभाव मिटविण्यासाठी एचआयव्ही / एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा २०१७ याची अंमलबजावणी करण्यात यावी या बदल माहिती देण्यात आली आणि HIV ACT 2017 Sun Board प्रदान करण्यात आले. या संपुर्ण सर्वेदीकरण कार्यशाळा संपन्न करण्यामागे DAPCU कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.