पंचायत समिती गडचिरोली परिसरात हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्राचा लोकार्पण तथा उद्घाटन सोहळा

पंचायत समिती गडचिरोली परिसरात हिरकणी कक्ष
तथा महिला सुविधा केंद्राचा लोकार्पण तथा उद्घाटन सोहळा

गडचिरोली, दि.02:गडचिरोली जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी हजारो महिला प्रवास करीत असतात व त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले सुद्धा असतात. अशा महिलांना त्यांच्या बालकांना स्तनपान करण्याकरीता सुरक्षित जागा नसल्याने बालकांना योग्य वेळेत स्तनपान/पोषण मिळत नाही अशा वेळी बालाकाला अनेक वेळा उपाशी राहावे लागते त्यामुळे परिणामी अशा बालकांच्या तब्बेतीवर परिणाम पडतो व त्यांच्या मातांना देखील मानसिक त्रास सहन करावा लागतो. सदरची आवश्यकता विचारात घेऊन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील तालुकास्तरावरील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरात हिरकणी कक्ष बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली अंतर्गत महिला व बाल विकास विभाग 3 टक्के राखीव निधीमधुन सन 2023-24 करिता गडचिरोली जिल्ह्यातील 12 पंचायत समित्या व 6 उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात शासकीय कामाने येणाऱ्या स्तनदा माता, मुली, महिला, वृद्ध महिला यांना आवश्यक त्या सुविधा सोई देण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात एकुण 18 हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली असुन या केंद्रात महिलांकरीता आवश्यक सर्वकष सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सर्वप्रथम पंचायत समिती, गडचिरोली येथील हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्राचे लोकार्पण तथा उद्घाटन सोहळा दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोज मंगळवारला सकाळी 12.00 वाजता पंचायत समिती कार्यालय, गडचिरोली येथे उद्घाटक म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली राहुल मीणा, यांच्या उपस्थितीत उद्घाटनिय सोहळा संपन्न होणार आहे. अशा प्रकारचे सर्व सुविधायुक्त अद्ययावत असणारा हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्र जिल्ह्यातील पहिले केंद्र आहे. असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.