वृक्ष लावा दारोदारी-पसरेल समृध्दी घरोघरी – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

वृक्ष लावा दारोदारी-पसरेल समृध्दी घरोघरी – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

              भंडारा,दि.25 : वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य असून  निसर्गाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण गरजेचे वृक्ष आल्यानेच घराघरात समृद्धी येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केसलवाडा येथील वृक्षारोपण कार्यक्रमात केले.केसलवाडा येथील वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.केसलवाडा येथील वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये  प्रमुख पाहुणे  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  बोलत होते.यावेळी गावकऱ्यांनी  त्यांचा   शाल ,श्रीफळ  आणि सोबतच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

        यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी वृक्षारोपण केले.

       यावेळी पोलिस अधीक्षक लोहीत मतानी,उपवनसंरक्षक राहुल गवई,तहसिलदार तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावकरी व विधार्थी उपस्थित होते. वृक्ष असती वसुंधरेचे जीवन या घोषवाक्याप्रमाणे  झाडाचे महत्व पर्यावरणामध्ये  अनन्य साधारण महत्व आहे,असे यावेळी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी सांगितले. होते.

      आपल्या गावात नियमित स्वच्छता राखा व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन नीट ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गावकऱ्यांना केले.