वाहतुक नियमांची जनजागृतीपर कार्यकमाचे आयोजन करण्यात आले

वाहतुक नियमांची जनजागृतीपर कार्यकमाचे आयोजन करण्यात आले

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान – 2024 अनुषंगाने जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, भंडारा व विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांचे वतीने डिफेन्स अकॅडमी, शहापुर येथे विद्यार्थी यांना वाहतुक नियमांची माहिती होवून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीकोनातून जनजागृतीपर कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनजागृतीपर कार्यकमास मा. श्री. विजू गवारे, न्यायाधीश, सचिन, विधी सेवा प्राधिकरण भंडारा, श्री. सुभाष बारसे, पो. नि. वानिशा, भंडारा श्री. सुधीर बोरकुटे, सपोनि पोलीस स्टेशन जवाहरनगर व श्री. पालांदूरकर, संचालक, डिफेन्स अकॅडमी शहापुर उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियान- 2024 हे दिनांक 15/01/2024 ते 14/02/2024 पर्यत राबविण्यात सेत असून त्याअनुषंगाने जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, भंडारा व विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांचे वतीने डिफेन्स अकॅडमी, शहापुर येथ्ज्ञील कार्यकमात मा. श्री. विजू गवारे, न्यायाधिश, सचिव, विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी विद्यार्थ्यांना वाहतुक नियम व रस्ते अपघात बाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच श्री. सुभाष बारसे, पोनि. वानिशा भंडारा यांनी पीपीटी चे सादरीकरण करुन विद्यार्थ्यांना वाहन चालवतांना कोण कोणत्या वाहतुक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये हेल्मेट, सिटबेल्टचा वापर करणे, अतिवेगाने व अतिभार वाहन न चालविणे. प्रामुख्याने वाहतुक नियमांचे उल्लघंन केल्याने अपघात हे घडत असतात. त्यामुळे वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन अपघातामुळे होणारी जिवीत व विनत हाणी टाळता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास पोलीस अंमलदार वसंत गजभिये, नवनाथ डोईफोडे, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.