सुदृढ आरोग्यासाठी सर्व मुलांचे लसीकरण व्हावे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने गुल्हाने यांचे प्रतिपादन

सुदृढ आरोग्यासाठी सर्व मुलांचे लसीकरण व्हावे

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने गुल्हाने यांचे प्रतिपादन

बाबुपेठ येथे जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
चंद्रपूर, ता. ३ : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी शहरातील सर्व १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.  

जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवार, दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून पार पडला. यावेळी आरोग्यसेविकांनी शाळेतील विद्यार्थींनीना लस टोचली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ वनिता गर्गेलवार यांनी केले. ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, एकूण ७६ हजार २५ मुलांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुळकर, सहायक आयुक्त विद्या पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, मनपाचे शिक्षण अधिकारी नागेश नित यांची उपस्थिती होती.

यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती.