मराठा समाजाचे व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकास नागरीकांनी सहकार्य करावे – तहसीलदार पानमंद

मराठा समाजाचे व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकास नागरीकांनी सहकार्य करावे – तहसीलदार पानमंद

सर्वेक्षणाचे कामा करीता 258 अधिकारी, कर्मचारी याची सेवा अधिग्रहीत

सिंदेवाही – मराठा समाजाचे व खुल्या प्रवर्गाचे मागासलेपण तपासण्या साठी मा.राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नवलीचा सर्वक्षण्याचे काम काज युध्द प्रातळीवर दि.23/01/2024 पासुन सिंदेवाही तालुक्यात सुरु झाले असून दि. 31/01/2024 पर्यंत घरोघरी प्रगणक जाऊन सर्वे करत आहेत. या सर्वेक्षणाचे कामा करीता शासकीय विविध विभागातील 258 अधिकारी, कर्मचारी याची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. अशी माहीती सिंदेवाही तहसीलदार तथा नोडल अधिकारी संदीप पानमंद यांनी दीली आहे तसेच घरोघरी सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकास नागरीकांनी सहकार्य करावे अशे आवाहन केले आहे.