सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे ‘ सभागृहाचा लोकार्पण व निवृत्ती कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार’ सोहळा संपन्न 

सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे ‘ सभागृहाचा लोकार्पण व निवृत्ती कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार’ सोहळा संपन्न 

सिंदेवाही दि.२७/०१/२०२४ ला विद्या प्रसारक संस्था,सिंदेवाही द्वारा संचालित सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे खासदार निधीतून निर्माण करण्यात आलेल्या पं. दीनदयाल उपाध्याय सभागृहाचा लोकार्पण सोहळा,संस्थेतील निवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार चिमूर निर्वाचन क्षेत्र,मा.नागराजजी गेडाम, मा.कमलाकर शिद्दमशेट्टीवार, मा. राजूभाऊ बोरकर,मा. गणवीर सर, मा.लोकनाथ बोरकर इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते,संस्थेचे अध्यक्ष मा. योगेंद्रजी जयस्वाल, सचिव मा. अरविंद जयस्वाल, सहसचिव मा.मनोहररावजी नन्नावरे, सदस्य मा.डॉ.सतीश चिंतावार, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.राजेश डहारे,सर्वोदय उच्च माध्य.विद्यालय सिंदेवाही प्राचार्य अतुल केकरे सर सर्वोदय कन्या उच्च माध्य.विद्यालय सिंदेवाही प्राचार्या कु. संगीता यादव सर्वोदय विद्यालय गडबोरीचे प्र.मुख्याध्यापक अंकुशकुमार नंदनवार यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.अतुलभाऊ देशकर यांना संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यानंतर मान्यवराच्या प्रमुख उपस्थित सेवानिवृत्त कर्मचारी महाविद्यालयाचे माजी कार्यकारी प्राचार्य डॉ. विजेंद्र बत्रा,केशव शिवणकर सर,आनंद नेवारे सर यांना शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी सारंग माकडे,निखिल चहांदे, जानवी सूचक, पूजा परवते,कृतिका मुळे, तनवी सदनपवार व खेळात प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी गायत्री मानकर,आकांक्षा मोहुर्ले,प्रतीक्षा आदे, आचल मेश्राम, वैष्णवी मोहूर्ले नेहालिका सय्यद,भैरवी मोहुर्ले, ज्योत्स्ना लोखंडे,अल्फीया शेख,हर्षल थेरकर,मृणाली बोरकर,ऐश्वर्या बोरकर,ऋतुजा कोवे,गुंजन सरवटे यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.सत्कार समारमानंतर महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रमाला घेण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रिजवान शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.नागलवाडे सर यांनी केले