देशभक्तीपर गीतांनी जिंकली रसिकांची मने

मेरे देश की धरती….देशभक्तीपर गीतांनी जिंकली रसिकांची मने

भंडारा दि. 28 : सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन भंडारा यांच्या वतीने 26 जानेवारी 2024 पासून सुरू आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी काल  सायंकाळी संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी सरगम स्टुडिओ च्या कलाकारांनी भक्ती संगीत तसेच जुने नवीन फिल्मी गाण्यांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली. सारेगम फेम संघपाल तायडे तसेच त्यांच्या सहकार्यानी अप्रतिम अशा भक्ती संगीत तसेच फिल्मी गाण्याची प्रस्तुती केली.

मेरे घर राम आये है, मेरे देश की धरती, सैराट झालं जी, जट येमाला पागला दिवाना ई. गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. तसेच कलाकारांची नृत्यही (जहां पांव में पायल हाथ में कंगन) आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली.

या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी श्री. श्रीपती मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फलके तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व जिल्हयातील रसिक श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.