अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील समाज बांधवांनी रमाई आवास योजना (शहरी) घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील समाज बांधवांनी
रमाई आवास योजना (शहरी) घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

गडचिरोली, दि.31: अनुसूचित जाती व नवबौद्ध व्यक्ती/ कुटूंबाना स्वत:चे पक्के घर उपलब्ध करुन देणे व या प्रवर्गातील कुटूंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे, या उद्देशाने ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रर्वगातील समाज बांधवांसाठी रमाई आवास योजना (शहरी) घरकुल योजना राबविण्यात येते. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बांधवांनी वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांनी संबधित नगरपरिषद/नगरपंचायत अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयास अर्ज सादर करावे.
योजनेच्या अटी व शर्ती : सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.3.00 लाख पेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुंटुबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर भुखंड असल्याचा पुरावा नमुना -8 किंवा मालमत्ता नोंदपत्र (प्रापर्टी रजिस्टर कार्ड) अर्जदाराचे आधार ओळखपत्र, निवडणुक मतदार ओळखपत्र, राशन कार्ड, घरकर पावती, नगरपरिषद/ नगरपंचायत मध्ये सादर करावे. अधिक माहिती करीता व अर्जाकरीता नगरपरिषद/ नगरपंचायत कार्यालय किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली 07132-222192 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.