जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे थाटात उद्धाटन

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे थाटात उद्धाटन

गडचिरोली, दि.01: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली च्या वतीने दि. 28 नोव्हेंबर, 2023 रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर महोत्सवाचे उद्धाटन समारंभ दि. 28 नोव्हेंबर, 2023 रोजी करण्यात आला असून या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली, डॉ. अनिता लोखंडे, वरिष्ठ प्राध्यापक, महिला महाविद्यालय, गडचिरोली, ओमप्रकाश संग्रामे, उपमुख्याध्यापक, गोंडवाना सैनिकी विद्यालय, नवेगाव, गडचिरोली, प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी, भास्कर घटाळे, तालुका क्रीडा अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी सहभागी कलाकारांना युवा महोत्सवाचे महत्व पटवुन दिले.
तसेच उद्धाटन समारंभा प्रसंगी परिक्षक म्हणून ज्यांची सेवा घेण्यात आली होती, अशा परिक्षकांना कार्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षक म्हणून ओमप्रकाश संग्रामे, डॉ. अनिता लोखंडे, खुशाल मस्के, डॉ. विलास खुणे, पी.एस. बोरीकर, मदन टापरे, डॉ. डी. डब्लू उईके, डॉ. एस.पी. रामटेके, डॉ. आर.एस. करंगामी, संजय घोटेकर यांनी विविध कलाप्रकाराचे परिक्षण करुन परिक्षक म्हणून कामगीरी भुषविली.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये विविध कला बाबीमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य कलाकारांनी सहभाग नोंदविला असून आपल्या कलेचे उत्कृष्टरित्या प्रदर्शन केले व जिल्ह्यावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. अशा कलाकारांना दि. 29/11/2023 रोजी कार्यालयाच्या वतीने खालीलप्रमाणे रोख पारीतोषीक देण्यात आले.

अ.क्र. कलाकाराचे नाव जिल्हास्तर युवा महोत्सवातील कलाप्रकार व प्राविण्य रक्कम
1 समुह लोक नृत्य प्रथम-गोंडवाना गृप, गडचिरोली
(अंतबाध अनिल बोरकर) 7,000/-
द्वितीय-शिवाजी हायसकुल, गडचिरोली
(समिक्षा उमाकांत कुकुडकर) 5,000/-
तृतीय-कृषी महाविद्यालय, गडचिरोली
(श्रृती रमेश चौके) 3,000/-
2 वैयक्तिक सोलो लोक नृत्य प्रथम- अनुप अमर माझी 3,000/-
द्वितीय- प्राजक्ता दिलीप मुळे 2,000/-
तृतीय- समिक्षा यादव मुळे 1,500/-
4 वैयक्तिक युवा लोकगीत प्रथम- अरबाज मुस्तफा शेख 3,000/-
द्वितीय- मोनिका चंद्रभान मगरे 2,000/-
तृतीय – सानिका दिवाकर पेंदाम 1,500/-
5 कथालेखन प्रथम-कुलदिप योगेंद्रजी सावतवान 3,000/-
द्वितीय- अनुप वसंत कोहळे 2,000/-
तृतीय- डिंम्पल खुशाल मस्के 1,500/-
6 पोस्टर स्पर्धा/ चित्रकला स्पर्धा प्रथम- दर्शना राजेश वंजारी 3,000/-
द्वितीय- त्रीरत्ना खुशाल मेश्राम 2,000/-
तृतीय- पुर्वा वसंत काटे 1,500/-
7 वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) प्रथम- शुभांगी दि. सुरपाम 3,000/-
द्वितीय- आकांशा भारत टेकाम 2,000/-
तृतीय- अरबाज मुस्तफा शेख 1,500/-
8 सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान (संकल्पना आधारीत स्पर्धा) प्रथम – आशिष सडमेक 5,000/-
द्वितीय- उत्कर्षा प्रधान 3,000/-
तृतीय- अनुप अमर माझी 2,000/-
9 तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर
(संकल्पना आधारीत स्पर्धा) प्रथम- वेदीका धाईत 5,000/-
द्वितीय- पलक मडावी 3,000/-
तृतीय- पुनम पुन्नमवार 2,000/-
10 हस्तकला प्रथम- अर्जना बापूर सडमेक 3,000/-
द्वितीय- काजल वासुदेव शेंडे 2,000/-
तृतीय – आदित्य सुरेंद्र मुनघाटे 1,500/-
11 वस्त्रोद्योग प्रथम- अथिनी नरेंद्र जुमनाके 3,000/-
द्वितीय- साहिल प्रभाकर आत्राम 2,000/-
तृतीय- श्रृती दिवाकर मडावी 1,500/-
12 अग्रो प्रोडक्ट प्रथम- राहिनी प्रेमानंद लाडे 3,000/-
द्वितीय- सायली रमेश आत्राम 2,000/-
तृतीय- स्नेहल सुधाकर कुमरे 1,500/-
वर नमुद केल्याप्रमाणे बक्षिस व प्रमाणपत्र देऊन कलाकारांना याप्रसंगी डॉ. शुभांगी परशुरामकर, प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मदन टापरे तर आभार एस.बी. बडकेलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कार्यालयातील क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, विशाल लोणारे, कुणाल मानकर, सुनिल चंद्रे, महेंद्र रामटेके, प्रविण बारसागडे व चैतन्य भसारकर यांनी अथक परिश्रम घेतले. युवा महोत्सवामध्ये जिल्ह्याभरामधून विविध कलाबाबीमध्ये 100 ते 125 कलाकारांनी सहभाग नोंदविला होता असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे कळवितात.