13 मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण सोहळा संपन्न

13 मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण सोहळा संपन्न

गडचिरोली, दि.27:प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यायमहाअभियान पीएम जनमन या अभियानाव्दारे पीव्हीटीजी कुटुंबासाठी आरोग्य आणि पोषण यासारख्या मुलभूत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रीत
करण्यात आले आहे. पीएम जनमन अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार गडचिरोली जिल्हयातील आदीम जमाती समुहाच्या सामाजिक आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मोबाईल मेडिकल युनिट तैनात करुन ANM व्दारे सेवा देणे व आयुष्यमान कार्ड उपलब्ध करुन देणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत गडचिरोली जिल्हयातील ५६० आदिवासी गावामध्ये १३ मोबाईल मेडिकल युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा, धानोरा, कोरची या तालुक्यामध्ये मोबाईल मेडिकल युनिट मार्फत आयुष्यमान कार्ड, सिकलसेल तपासणी, क्षयरोग तपासणी, साथीचे रोग तपासणी, मलेरीया, लसीकरण, कुष्ठरोग, राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी व १८ प्रकारची औषधी व १२ प्रकाराचे प्रयोगशाळा तपासणी मोफत होणार होणार आहे. सदर मोबाईल मेडिकल युनिट मध्ये १) वैद्यकिय अधिकारी, २)प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३ ) फॉर्मसी अधिकारी ४) स्टाफ नर्स ५) वाहन चालक ईत्यादी कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहे. या १३ मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण सोहळा खासदार अशोक नेते व आमदार डॉ.देवराव होळी, आयुषी सिंग मख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली. यांचे हस्ते ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून करण्यात आले. यामध्ये श्री. भुयार उप मुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जि. प. गडचिरोली, डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी. जि. प गडचिरोली डॉ. प्रफुल हुलके, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, डॉ. विनोद मशाखेत्री, साथरोग अधिकारी डॉ. पंकज हेमके, डॉ. रुपेश पेदाम, डॉ. अमित साळवे तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली नागेश ताटलावार, रचना फलझेले व मोबाईल मेडिकल युनिट सर्च ( धानोरा ) व मोबाईल मेडिकल युनिट गडचिरोली पथक उपस्थित होते