सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनलवर

सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनलवर

व्हॉटेसअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 20 सप्टेंबर 2023 :

महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉटसॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉटसॲप चॅनलचा शुभारंभ करण्यात आला आहे. श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्वाचे निर्णय, श्री मुनगंटीवार यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती, त्यांचे विविध कार्यक्रम, दौरे, बैठका यांची माहिती या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

समाजातील संवाद माध्यमांमधे नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावीे माध्यम ठरलेल्या ‘व्हॉटसॲप’ने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे. व्हॉट्सअप चॅनेलवर विश्वगौरव पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सचिवालयाच्या चॅनल सोबत स्वतःचे व्हॉट्सअप चॅनेल सुरु करणारे श्री सुधीर मुनगंटीवार हे पहिलेच मंत्री ठरले आहेत.

सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधीकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.

या व्हॉट्सअप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सअपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सअप क्रमांकही व्हॉटेसअपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सअप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सअप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेले हे अधिक मुक्त, स्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेल, असे मत ना. श्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

*चॅनलला असे करा फॉलो :*
व्हॉटस ॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनल विभागात हे चॅनल आहे. त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va9ERCr4NViuAvsdCI14 या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या चॅनलला फॉलो करता येणार आहे.