जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शन कार्यशाळा व अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शन कार्यशाळा व अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली, दि.26: दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) , महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमात विवीध विषयावर मार्गदर्शक कार्यक्रम व अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, वामन सावसाकडे, जिल्हाध्यक्ष, किसान सेल, कॉंग्रेस पक्ष, मनोहर हेपट, बसवराज मास्तोळी , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रविण गेडाम, शास्त्रज्ञ, BSMTC, भंडारा, श्रीमती निलिमा पाटील, विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान , कृषि विज्ञान केंद्र , गडचिरोली, नरेश बुध्देवार,विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र , गडचिरोली, अजय वासनिक, जिल्हा रेशीम अधिकारी, गडचिरोली, हे उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ.परशुराम खुणेयांनी शेतकरी बांधवांना कृषि विभागाच्या विवीध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. वामन सावसाकडे,जिल्हाध्यक्ष, किसान सेल, कॉंग्रेस पक्ष व मनोहर हेपट यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
डॉ.प्रविण गेडाम, शास्त्रज्ञ,BSMTC, भंडारा यांनी शेतक-यांना रेशीम उद्योग व रेशीम किटक पालनविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अजय वासनिक, जिल्हा रेशीम अधिकारी, गडचिरोली यांनी रेशीम उद्योग विषयी मार्गदर्शन केले. श्रीमती निलिमा पाटील, विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान , कृषि विज्ञान केंद्र , गडचिरोली यांनी भरडधान्याचे मानवी आरोग्यातील महत्व विषयी मार्गदर्शन केले. नरेश बुध्देवार, विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र , गडचिरोली यांनी हवानावर आधारित रब्बी पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले.
विलास निंबोरकर, राज्यकार्यवाहक, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, गडचिरोली, विठ्ठलराव कोठारे, जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, गडचिरोली, विलास पारखे, प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, गडचिरोली, उपेंद्र रोहणकर, हरीदास कोटरंगे, श्रीमती प्रतिभाताई चौधरी यांनी अंधश्रध्दा निर्मुलनाकरीता एकांकी नाटीका सादर केली. आजच्या तिस-या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी , महिला व विद्यार्थ्यांनी कृषि महोत्सवास भेट दिली. असे प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली यांनी कळविले आहे.