जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा दिनी अभिवादन

    जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा दिनी अभिवादन

         भंडारा, दि.30 :  हुतात्मा दिनानिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, नैसर्गिक आपत्ती विभागाचे अधिकारी,अभिषेक नामदास, नायब तहिलदार गजानन मेश्राम, यांच्यासह  अन्य अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.