प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिवसाची प्रशासनाची तयारी

प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिवसाची प्रशासनाची तयारी

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजवंदन

भंडारा, दि. 25 : भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 26 जानेवारीला सकाळी ठीक सव्वा नऊ वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याहस्ते पोलिस  कवायत मैदानावर ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे.

        पोलिस कवायत मैदान येथे यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. मान्यवरांना निमंत्रण पाठविण्यात आले असून  काल पोलीस दल व विविध पथकांनी या ठिकाणी पथसंचलनाची रंगीत तालीम केली.

        पालकमंत्री ध्वजवंदनानंतर नागरिकांना संबोधित करणार आहे. यावेळी प्रमुख अतिथींच्या विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

    या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती, पोलीस दलांचे लयबद्ध पथसंचालन, बघायला मिळणार आहे. पथसंचलनामध्ये विविध पथक सहभागी होत आहे. .

 समालोचन करण्याचा विक्रम

             प्रजासत्ताक दिनाचे संचलन करण्याचे कार्य यावर्षी देखील स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर  करणार आहेत. त्यांच्या समालोचनाचा हा 21 वा वर्धापन दिवस आहे.