महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र/LIFE CERTIFICATE सादर करण्याबाबत सुचना

महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र/LIFE CERTIFICATE सादर करण्याबाबत सुचना

गडचिरोली, दि.20: महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की, आपण ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन/ कुटूंबनिवृत्तीवेतन घेता त्याच बँकेत, आपण हयात असल्याबाबत दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पासून हयात प्रमाणपत्र /LIFE CERTIFICATE भरावे. जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे बँकेस निवृत्तीवेतनधारकांची यादी पुरविण्यात आलेली आहे. त्यावर निवृत्तीवेतनधारकांनी अंगठा/ स्वाक्षरी करावी. असे अप्पर कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.