गुरव वीरशैव लिंगायत समाजासाठी महामंडळे कार्यान्वित

गुरव वीरशैव लिंगायत समाजासाठी महामंडळे कार्यान्वित

भंडारा दि. 23 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्गत राज्यातील गुरव व वीरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळामार्फत राज्यातील गुरव व वीरशैव लिंगायत समाजातील गरजू व पात्र व्यक्तींना महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्यासाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. गुरव व वीरशैव लिंगायत बांधवांनी या महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आव्हान महामंडळामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.