शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन…

शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन…

मौजा- वलनी पं स .नागभीड जि.चंद्रपुर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले.

नागभीड:-आज दिं, २० जानेवारी २०२४ ला मौजा-वलनी पं.स.नागभीडच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने खासदार अशोक नेते यांनी संबोधित करताना म्हणाले की,या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांच्या नववर्ष पूर्ण झालेल्या कार्यकाळात केंद्र सरकारने घेतलेलेे ऐतिहासिक निर्णय व अनेक लोकाउपयोगी, लोकहिताचे,लोककल्याणासाठी केलेल्या विविध योजना याद्वारे कार्यान्वित केंद्र शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहचवुन ज्यांना आतापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही.अशांना या माध्यमातून सदर केंद्र शासनाच्या योजनांची थेट माहिती व लाभार्थ्यापर्यंत व जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रकारचं माध्यम आहे.
यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या अनेक विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी मंदिर स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्याने आपण दिवाळी सारखा सण साजरा करावा. प्रत्येकांनी आपल्याला घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा व विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे प्रतिपादन या यात्रेच्या शुभारंभाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा ग्रा.प.सदस्य वलनी चे होमदेव मेश्राम, वलनीचे सरपंच दिनकर पर्वते,थानेदार देवरे साहेब, उपसरपंच प्रकाश सुरपाम,माजी सरपंच अनिल बोरकर,आरोग्य अधिकारी डॉ.मडावी साहेब, तालुका कृषि अधिकारी शिंदे मॅडम, आदिवासी आघाडी चे नेते कैलास कुमरे,
तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक बंधू भगिनीं,आशा वर्कर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिती होते.